Breaking News

सलग दुसर्‍या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत

मुंबई : हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार की मुंबईला यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर अधिवेशनाची तारीख ठरली असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अधिवेशन नागपूरला घ्यावे की मुंबईला यावरून महाविकास आघाडी सरकारमध्येच मतभेद होते, मात्र आता हे अधिवेशन मुंबईतच होणार आहे. हा निर्णय घेण्यामागे करोनाचे सावट आणि विधान परिषद निवडणूक ही कारणे असल्याचेही बोलले जात आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply