माणगाव ः प्रतिनिधी
येथील सुपर सिलेक्टर्स संघाने आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत थळ (अलिबाग) संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन दाखवत चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. त्यांनी अंतिम सामन्यात अप्पर तुडील संघाचा दारुण पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
माणगावजवळील निळगुण फाटा येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ए वन निजामपूर संघाने तृतीय क्रमांक व वायएमसीसी वणी संघ चतुर्थ क्रमांक मिळविला. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून आदिल कुरेशी (थळ), मालिकावीर रिहान लोरे (अप्पर तुडील), उत्कृष्ट फलंदाज मोहम्मद कैफ (वणी) आणि उत्कृष्ट गोलंदाज अशांक साखरकर (थळ) याची निवड करण्यात आली.
Check Also
पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …
RamPrahar – The Panvel Daily Paper