पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वप्नांना पंख असतात असे म्हणतात, पण त्या पंखांमध्ये मेहनतीचेही बळ असते. अशाच एका तरुणाने जिद्दीने, चिकाटीने आणि मेहनतीने आपल्या स्वप्नपंखांमुळे यशस्वी भरारी घेतली आहे. उमेश मगर या तरुणाने आपल्या आई वडिलांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचे स्वप्न स्वत:च्या वाढदिवसानिमित्त नुकतेच साकार केले.
पनवेल तालुक्यातील आजिवली गावातील हा मुलगा गवंडी कामगारांच्या कुटुंबात जन्मला, आईवडील दोघेही गवंडी. आईवडिलांनी त्याला गरीब परिस्थितीत वाढवला, शिकवला त्यांच्या कष्टाचे आज चीज होताना दिसत आहे. त्यांच्या कष्टाळू चेहर्यावर आज सुखाचे स्मितहास्य ओसंडून वाहताना दिसतेय. त्यांच्यासाठी आजचा दिवस मुलाच्या यशामुळे खर्या अर्थाने सोन्याचा ठरला आहे.
उमेश मगरच्या वाढदिवसाला पनवेल तालुका भाजपचे सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, कोन ग्रामपंचायतचे सरपंच निलेश म्हात्रे, उपसरपंच महेंद्र गोजे, सदस्य ज्ञानेश्वर भागीत, जगन्नाथ सारडेकर, महेश माळी, माजी सदस्य संतोष पाटील, पनवेल तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष आप्पा भागित याच्यासह पंचकोशीतील नागरिक उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper