नांदगाव मराठी शाळेतील डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील नांदगाव येथील मराठी प्राथमिक शाळा नं.1 मध्ये डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन सरपंच वैशाली विनोद पवार व उपसरपंच अस्लम हुसेन हलडे यांच्या हस्ते करण्यात आले. नांदगाव ग्रामपंचायतीने दिलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सदर क्लासरुमचे काम करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षिका या वेळी उपस्थित होत्या. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सेजल घुमकर, सदस्य सचिन पाटील, अशोक पाटील, शिक्षक रुपेश बांद्रे, सुरवसे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापिका अंजली दळवी यांनी आभार मानले.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply