Breaking News

शरद पवार यांचा यू-टर्न!

मुंबई : प्रतिनिधी

माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असतील या प्रश्नावर उत्तर देताना मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.

शरद पवार यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले होतेे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बहुमत न मिळाल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटतात, असे विधान पवार यांनी केल्याचे वृत्त प्रकाशित झाले. यावर पवारांनी सोमवारी (दि. 29) स्पष्टीकरण दिले.

राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी महाआघाडीकडे आणखी कोणते नेते आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती यांचे नाव घेतले, पण वृत्तपत्राने छापलेल्या मुलाखतीत माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे पवार यांनी सांगितले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply