Breaking News

14 वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत पनवेलचा संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 14 वर्षाखालील 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघांनी भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण संघाचा पराभव करीत विजेतेपदाचा मान मिळवला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या भेंडखळ संघांची सुरुवात अडखळत झाली. सलामीचा फलंदाज साम्य पाटील वगळता कोतणाही फलंदाज पनवेल संघाच्या गोलंदाजांसमोर मोठी धावसंख्या करू शकला नाही. पनवेल संघाचा जादुई गोलंदाज अनिष निमसे याने सर्वाधिक पाच बळी टिपले. त्याला आर्यन शर्मां आणि वेदांत सोनावळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून उत्तम साथ दिली. भेंडखळ संघाचा डाव सर्व गडी बाद 106 धावांत आटोपला. प्रतिउत्तर देताना पनवेल संघांच्या सलामीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करीत सामना आपल्या बाजूने वळविला. श्रवण खारोल 43 आणि निलंय सावंतच्या 44 धावांच्या सहाय्याने पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघांनी भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघावर सहज विजय मिळवला. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून पाच बळी घेणार्‍या अनिष निमसेला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाजी करणार्‍या भेंडखळ संघाचा फलंदाज निर्जर पाटील, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पनवेल संघाचा अनिष निमसे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निलंय सावंत, तर संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा अष्टपैलू खेळाडू क्रिश पाटील याला मालिकवीर म्हणून गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजेश पाटील, अ‍ॅड. प्रथमेश पाटील, अ‍ॅड. गौरव लेले, निहाल अग्रवाल, पलाश चवरकर, लवाज लुब्रिकन्ट्सचे मालक रतन खारोल, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संदीप पाटील, सागर कांबळे, सुहास हिरवे, सुयोग चौधरी, पंचायत सदस्य किशोर जैन, जितेंद्र जैन, अभय घरत, झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, खजिनदार दिपक साळवी, सदस्य अजय टेमकर, स्पर्धा समितीचे प्रमुख सुजित साळवी,संतोष चवरकर, मनोज भगत, इम्रान बुराण, जय पाटील, शैलेंद्र भगत, अ‍ॅड. पंकज पंडित, संदीप सावंत यांच्यासह पोयनाड विभागातील क्रिकेटरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply