पनवेल ः कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, पीआरओ बाळासाहेब कारंडे, रायगड विभागीय कार्यालय प्रमुख संतोष गुजर उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …