Breaking News

रा.स्व.संघ जनकल्याण समितीतर्फे परिचारिकांचा सन्मान

खोपोली : प्रतिनिधी

जागतिक परिचारिका दिनानिमित्त जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 12) खोपोलीतील डॉ. डोंगरे, डॉ. वानखेडे, डॉ. ठाकूर यांच्या रुग्णालयात जाऊन तेथील परिचारिकांचा गुलाब पुष्प आणि कॅडबरी चॉकलेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. परिचारिका या रुग्णाची एखाद्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सेवा करीत असतात. कोरोना सारख्या महामारीच्या काळातही जीवाची बाजी लावून त्या काम करीत आहेत. त्यामुळे जागतिक परिचारिका दिनी त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांचा हा सन्मान जनकल्याण समितीच्या वतीने केला असल्याची माहिती जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खालापूर तालुका कार्यवाह अविनाश मोरे, जिल्हा कार्यकर्ते रोहित कुलकर्णी, सचिन कुंटे, ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे या वेळी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply