महाड ः तालुक्यात कांबळे तर्फे महाड गावाजवळ जप्त केलेला जुना विस्फोटक मुद्देमाल नष्ट करीत असताना झालेल्या स्फोटात तीन पोलीस कर्मचारी गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला आहे. गंभीर जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबई येथे हलवण्यात आले आहे. हा मुद्देमाल कांबळे येथील एका दगडखाणीत नष्ट करताना मंगळवारी (दि. 8) स्फोट झाला. यात अलिबाग येथून आलेले राहुल दोशी, रमेश कुटे, आशीर्वाद लगदे असे तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत, तर एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. दरम्यान, या स्फोटाने परिसरातील गावांमध्ये मोठे धक्के बसले. यामुळे गावातील घरेदेखील हादरली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper