पनवेलमध्येही भाजप स्थापना दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन पनवेलमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे संबोधित केले. त्या अनुषंगाने पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात या संवाद कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते.
या थेट प्रक्षेपणास भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, नगरसेवक अनिल भगत, संतोष शेट्टी, विकास घरत, नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, हेमलता म्हात्रे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष वर्षा नार्ईक, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, संजय जैन, अमरीश मोकल, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष के. सी. पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप, भाऊ भगत, जितेंद्र वाघमारे, निलेश चोणकर, महेंद्र वावेकर, चिन्मय समेळ, विजय म्हात्रे, गणेश म्हात्रे, अशोक आंबेकर, नूतन पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे मार्गदर्शन केले आहे त्यानुसार सर्वांनी झोकून काम करावे, असे आवाहन या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
दरम्यान, भाजप स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात सुरेख रांगोळी तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

Check Also

The nitropolis 2 slot way to get 10 mBTC free bonus coins to help you Crypto Enjoyment Casino?

Articles Nitropolis 2 slot | Chance Jack – Majetic 7Football Anticipate Games Greeting added bonus …

Leave a Reply