उलवे नोड : रामप्रहर वृत्त
शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळ उलवे आणि शेलघर ग्रामस्थांच्या माध्यमातून उलवे नोड सेक्टर 16 येथे श्री गणेश मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) झाले. या वेळी त्यांनी शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्या उपक्रमांचे कौतुक केले व मंदिर उभारणीकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, महिला मोर्चा उलवे नोड अध्यक्ष योगिता भगत, अनंता ठाकूर, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुजाता पाटील, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, आशिष घरत, अजय भगत, शेलघर गावचे अध्यक्ष अमृत भगत, सुहास भगत, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनूप भगत, भूषण भगत, शिवगर्जना मित्र मंडळाचे अध्यक्ष नवनाथ जाधव, सचिन खरात, अनिल गमरे, हेमंत बापट, प्रकाश बनकर, विलास चौगुले, राजाराम गडदे, अरविंद काटकर, कांतीलाल कुंभार, सुशील सिंग, विनय ठाकूर, शैलेश राणे, दशरथ इंगवले, भारतीय समाजिक संस्थेचे अध्यक्ष अवधेशकुमार महतो, सचिव मनोजकुमार मौर्या, गौतम कुमार, गुलाबसिंह तंवर, धर्मेंद्र परमार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …