Breaking News

पाछापूर पंचशीलनगरात सोलर नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील दुर्गम दुर्लक्षित  व डोंगर कड्या कपारीत वसलेल्या शेकडो आदिवासी वाड्यापाड्या गावांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाताहेत. प्रशासनाला याकामी स्वदेश फाउंडेशनची मोलाची साथ लाभली आहे. बौद्ध विकास मंडळ पाछापूर पंचशीलनगरात सोलर नळपाणी पुरवठा योजनेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वदेश फाउंडेशनचे शिवदास पायल यांनी सदर योजनेची माहिती दिली. यावेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार, सुधागड तालुका बौद्धजन कमिटी अध्यक्ष भगवान शिंदे, प्रभाकर गायकवाड, स्वदेश फाउंडेशन व्यवस्थापक शिवदास पायल, अमूल त्रिभुवन, सिद्धांत गायकवाड, राहुल महाडिक, मधुकर महाडिक, विजय महाडिक , ग्रामविकास समिती पंचशीलनगर, बौद्ध विकास मंडळ पंचशीलनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ग्रामस्थांनी या बद्दल समाधान व्यक्त केले.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply