रसायनी पाताळगंगा रोटरी व रोटरॅक्टर क्लबचा उपक्रम
मोहोपाडा : प्रतिनिधी
भाताण येथील अॅमेटी विद्यापीठात रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, रोटरॅक्टर क्लब पाताळगंगा, अॅमेटी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 520 विद्यार्थी व विद्यापीठ स्टाफचे ब्लड चेकअप रजिस्ट्रेशन झाले. यात विद्यार्थ्यांकडून रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून 221 ब्लड बॅग रक्तदान कलेक्ट झाल्या.
अमेटी विद्यापीठाचे व रोटरॅक्ट क्लब पाताळगंगाचे उत्कृष्ट नियोजन हॉलमध्ये शिबिर यशस्वीरित्या झाले. शिबिराच्या उद्घाटनाला अॅमेटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. डब्लू. संतोषकुमार, अॅमेटी कॉलेजचे विद्यार्थी, काउन्सिलचे प्रमुख डॉ.गौतम गवळी, रोटरी क्लब पाताळगंगाचे अध्यक्ष गणेश काळे, सेक्रेटरी संदीप साबळे, रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष रोहन गावडे, सेक्रेटरी समृद्ध उचिल, अॅमेटी विद्यापीठ विद्यार्थी काउंन्सिलचे अध्यक्ष अभिषेक करीसिद्धीमठ, सेक्रेटरी रिद्धी मुनोथ व रोटरी क्लब पाताळगंगाचे सभासद शारदा काळे, उमा मुंढे, ऋतूजा भोसले, वर्षा पाटील, मेघा कोरडे, अॅनेट तनिष्का, बाळकृष्ण होनावळे, डॉ.मिलींद भगत, दीपक चौधरी, देवेंद्र, गणेश वर्तक, सुनील कुरुप, अमित शहा, विजय पाटील आदी उपस्थित होते.
रोटरी ब्लड बँक न्यू पनवेल व तेरणा हॉस्पिटल ब्लडबँक न्यू पनवेल व त्यांच्या स्टाफने योग्यरित्या शिबिराची जबाबदारी स्वीकारली. शिबिराची सुरुवात होनावळे सरांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून केली, तसेच उपस्थित मान्यवर व ब्लडबँकेच्या कर्मचार्यांचे व डॉक्टर्सचे आभारमानून शिबिराची सांगता झाली.