Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला महाराष्ट्रात

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. पंतप्रधान 14 जूनला राज्यात येणार असल्याच्या माहिती भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्वीट करून दिली. पंतप्रधान देहूत मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदी याआधी 6 मार्चला पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आले होते. आचार्य तुषार भोसले यांनी दोन महिन्यांपूर्वी 29 मार्चला पंतप्रधानांची भेट घेतली होती. या भेटीत भोसले यांनी पंतप्रधान मोदी यांना आमंत्रण दिले होते. त्या वेळी त्यांच्यासोबत देहू संस्थानचे विश्वस्तही उपस्थित होते. भोसले यांनी दिलेले आमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले व त्यानुसार आता पंतप्रधान 14 जूनला देहूत येणार आहेत.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply