Breaking News

भात, नाचणी लागवड क्षेत्रात यंदा होणार वाढ

जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार

अलिबाग : प्रतिनिधी

यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. रायगडचे प्रथम क्रमांकाचे खरीप पीक असणार्‍या भाताची(तांदूळ) लागवड या एकूण लागवड क्षेत्राच्या 88.34 टक्के म्हणजे 1 लाख 4 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. द्वितीय क्रमांकाचे महत्त्वाचे पीक असणाजया नागलीची लागवड 5.70 टक्के म्हणजे 6 हजार 755 हेक्टर क्षेत्रावर होणार असल्याचे कृषि विभागाकडून सांगण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्याचे भात हे प्रमुख पीक असून 2018-19च्या खरीप हंगामात भाताचे क्षेत्र जिल्ह्यात 1 लाख 4 हजार 100 हेक्टर होते, त्यात यंदा 500 हेक्टरने वाढ होवून ते 1 लाख 4 हजार 600 हेक्टर झाले आहे. 2018-19च्या खरीप हंगामात नागलीचे 5 हजार 630 हेक्टर असणारे लागवड क्षेत्र यंदा 1 हजार 125 हेक्टरने वृद्धिंगत होवून 6 हजार 755 हेक्टर झाले आहे.

भाताची जिल्ह्यात सर्वाधिक लागवड अलिबाग तालुक्यात 14 हजार 300 हेक्टरात होणार असून त्या खालोखाल महाड तालुक्यात 13 हजार 300 हेक्टर तर माणगावमध्ये 12 हजार 500 हेक्टरात भात लागवड होणार आहे. नागलीची जिल्ह्यात सर्वाधिक 2 हजार हेक्टर लागवड माणगाव तालुक्यात होणार आहे तर महाडमध्ये 1 हजार 500 तर पोलादपूरमध्ये 1 हजार हेक्टरवर नागलीची लागवड होणार आहे. इतर तृणधान्यांची सर्वाधिक लागवड माणगाव तालुक्यात 1 हजार 200 हेक्टरवर होणार आहे. उर्वरित पिकांमध्ये 1.14 टक्के क्षेत्रावर म्हणजे 1 हजार 350 हेक्टर क्षेत्रावर तूर, 3.88 टक्के क्षेत्रावर म्हणजे 4 हजार 600 हेक्टरावर इतर तृणधान्ये तर 0.87 टक्के क्षेत्रावर म्हणजे 1 हजार 40 हेक्टर क्षेत्रावर इतर कडधान्यांची लागवड होणार आहे.

गत हंगामात भाताच्या उत्पादकतेत 52 किलो प्रति हेक्टरी वाढ 2018-19च्या खरीप हंगामात भाताची सरासरी उत्पादकता 2 हजार 769 किलो प्रति हेक्टर साध्य झाली होती. त्यापूर्वीच्या सरासरीपेक्षा ही उत्पादकता 52 किलो प्रति हेक्टरी अधिक प्राप्त झाली आहे. 2018-19 मध्ये नागलीची उत्पादकता 992 किलो प्रति हेक्टर प्राप्त झाली होती, ती सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत 175 किलो प्रति हेक्टर अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply