Breaking News

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा ;पेणच्या आर्यन पाटीलला रौप्यपदक

पेण : रामप्रहर वृत्त
हरियाणातील पंचकुला येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पेण तालुक्यातील रावे येथील खेळाडू आर्यन अरुण पाटील याने उंच उडीत रौप्यपदक पटकाविले. याबद्दल त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मंगळवारी (दि. 8) पदकांची लयलूट केली. यात रायगडच्या आर्यन पाटीलने 2.04 मीटर उंच उडी मारून रौप्यपदक जिंकले. महाराष्ट्राने मंगळवारी 11 सुवर्णपदकांसह एकूण 20 पदके कमावली. याच बळावर महाराष्ट्राने (24 सुवर्ण, 22 रौप्य, 17 कांस्यपदके) हरयाणाला मागे टाकत पुन्हा गुणतालिकेत अग्रस्थान प्राप्त केले आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply