Breaking News

नारंगी ग्रामस्थांच्या हरकतीवर कोकण भवनात होणार सुनावणी

सावरोली, आत्करगाव जिल्हा परिषद प्रभाग रचनेस ग्रामस्थांचा विरोध

पाली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022च्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सावरोली आणि आत्करगाव या प्रभाग रचनेस नारंगी गावातील काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवित हरकत घेतली आहे. या अनुषंगाने कोकण भवन या ठिकाणी सुनावणी ठेवण्यात आली आहे. रायगड जि. प. सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचनेचा निकष, प्रभाग विभाजन, त्यात समाविष्ट केलेली गावे व भौगोलिक वस्तुस्थिती यांचा प्रसिद्धी पत्रकात योग्य वापर करण्यात न आल्यामुळे हरकत घेण्यात आली आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील खालापूर तालुक्यातील गावांच्या यादीनुसार एकूण 153 गावांची संख्या व प्रभाग रचनेतील अधिसूचीतील गावांची संख्या 135 गावे अशाप्रकारे एकूण गावामध्ये तफावत आहे. या मुळे निनाद गायकवाड यांच्या हरकत अर्जाप्रमाणे भौगोलिक रचनेनुसार व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाचा संदर्भ धरून पाली फाटापासून मिरकूटवाडी रस्त्याचे पश्चिम बाजूची गावे व पाली फाटा ते पेण रोडकडील वावोशी मंडळ मधील सर्व गावे असा प्रभाग रचनेचा पुनर्विचार करावा अशी मागणी हरकत घेताना करण्यात आलेली आहे.

यासाठी घेतली हरकत : नवीन प्रभाग रचना झाल्यास दहागाव छत्तीशी विभागातील सर्व नागरिकांना न्याय मिळेल. रायगड जि. प. मतदार संघातील प्रभाग रचनेत करण्यात आलेले बदल हे नारंगी गावावर अन्यायकारक असून सावरोली आणि आत्करगाव प्रभाग रचनेतील निकष कोणत्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत निश्चित बोध होत नाही. त्यामुळे या प्रभाग रचनेस निनाद गायकवाड, सेवानिवृत्त उपअधिक्षक भूमि अभिलेख अधिकारी नरेंद्र गायकवाड, माजी सरपंच आनंद देशमुख आणि नारंगी गावातील ग्रामस्थांनी दि. 8 जून रोजी हरकत घेतली होती. त्यानुसार सुनावणी होणार आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply