Breaking News

पनवेल महापालिकेतर्फे योग दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षकांनी या वेळी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना योगासनाचे विविध प्रकार आणि प्राणायमसाठी मार्गदर्शन केले.  या वेळी सहाय्यक संचालक नगररचनाकार ज्योती कवाडे, उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, गणेश शेटे, कैलास गावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, आरसीएच अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, प्रभाग अधिकारी अमर पाटील, सदाशिव कवठे, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रदीप पाटील, रूपाली ठोमसे, संदंश मंडलिक, शंभू मठ यांनी भुंजगासन, ताडासन, धनुरासन, सर्वांगासन, शवासन असे योगासनांचे विविध प्रकार शिकवले, तसेच त्याचे शरीराला होणारे फायदे सांगितले. याचबरोबरच प्राणायम, कपालभाती शिकवून ध्यान कसे करावे, त्यांचे फायदे सांगितले.

उरण महाविद्यालयात योग दिन उत्साहात

उरण ः कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एन. गायकवाड यांनी, योगा ही एक दिवस करण्याची प्रक्रिया नसून दररोज योगा केला पाहिजे, असे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक योगा प्रशिक्षक पूनम चव्हाण यांनी, योगा ही जीवन जगण्याची कला असून नियमित योगाभ्यास केला तर आपण दुःखमुक्त व निरोगी होतो असे सांगितले तसेच प्राणायामाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना शिकवले. ज्येष्ठ प्रा.के.ए.शामा यांनी, योगामुळे जीवन आनंदी आणि प्रसन्न होईल त्यासाठी योगाभ्यास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. एम. जी. लोने यांनी केले. सूत्रसंचालन एन. एस. एस. प्रमुख प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. एच. के. जगताप यांनी व्यक्त केले.

उरण येथे योग दिनानिमित्त ठिकठिकाणी शिबिर

उरण ः उरण येथे बीपीसीएल, ओएनजीसी, फुंडे कॉलेज, गेट वे टर्मिनल, अनमोल इंग्लिश स्कूल, सीआयएसएफ ओएनजीसी, प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, इंडियन नेव्ही आदी ठिकाणी योगदिन साजरा झाला. योगशिक्षक दिनेश घरत, प्राजक्ता सर्वया, निकिता पवार, पूनम चव्हाण, बी. के. डिम्पल आदींनी योगासने करून दाखविली.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply