Breaking News

आयपीएलवरील सट्ट्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त

वडिलांची तीन मुलींसह आत्महत्या

वाराणसी ः वृत्तसंस्था

जुगारी वडिलांमुळे एक हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सट्ट्यात सर्वकाही हरल्याने एका पित्याने तीन मुलींना विष देऊन स्वत:देखील आत्महत्या केली. आता या कुटुंबातील केवळ मुलींची आई जिवंत आहे. माहेरी गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला, मात्र पती आणि मुलींच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वाराणसीतील लक्सा भागात राहणारा दीपक कुमार कपडे विकण्याचे काम करायचा. त्याच्या कुटुंबात पत्नीसह निबिया (9), अद्वितीय (7) आणि रिया (5) असे चार सदस्य होते. दीपक आयपीएलच्या सामन्यांवरील सट्ट्यात सतत पैसे हरत होता. त्याची पत्नी माहेरी गेल्याने तिला याबद्दलची कल्पना नव्हती. काकांनी त्यांच्या तीन मुलींना काहीतरी खायला दिल्याचे दीपक कुमार यांच्या पुतणीने सांगितले. काकांच्या तीन मुली अंगणात झोपल्या होत्या. काही वेळाने काका तिथे आले आणि त्यांना आत घेऊन गेले. त्यानंतर ते आजीच्या खोलीत जाऊन टीव्ही पाहू लागले. काही वेळाने त्यांची छोटी मुलगी रिया आजीजवळ गेली आणि वडिलांनी काहीतरी खायला दिल्याचे सांगू लागली. त्यावेळी काकांनी काहीतरी बहाणा सांगून शौचालयात गेले आणि त्यानंतर तिन्ही मुलींना उलट्या सुरू झाल्या, असे दीपक यांची पुतणी साक्षीने सांगितले.

तीन मुलींसोबतच दीपक यांनादेखील उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना कबीरचौरा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान चारही जणांचा मृत्यू झाला. दीपक आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज भांडणे व्हायची. त्यामुळेदेखील तो तणावाखाली होता, असे शेजारच्या लोकांनी सांगितले. आयपीएलवरील सट्ट्यात सतत हरल्याने दीपक कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे दीपकने मुलींच्या जेवणात विष कालवले आणि स्वत:ही विष घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply