Breaking News

कामगारांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन;   तळोजामध्ये भाजप प्रणित कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाली कामगारांना न्याय मिळवून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करत आहे. त्या पार्श्वभुमीवर तळोजा औद्योगीक वसाहतीमधील केमस्पेक केमिकल कंपनीमधील कंत्राटी कामगार जय भारतीय जनरल कामगार संघटनेत सामील झाले आहेत. त्यानुसार या कंपनीजबळ जनरल कामगरा संघटनेचे नाम फलक उभारण्यात आले आहे. या नामफलकाचे अनावरण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते मंगळवारी (दि. 8) झाले. या वेळी  आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कंपनी जगली तर कामगार जगतील. त्यामुळे कंपनी बरोबर सहकार्याची भावना आमची असणार आहे. पण हे सर्व कामगार स्थानिक रहिवासी आहे. त्यामुळे माझ्या मतदार संघातील कामगार आमच्या संघटनेचे सभासद असो किंवा नसो त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ प्रसंगी संघर्ष करण्यासही आम्ही तयार असतो याची नोंद कंपनीने घ्यावी प्रतिपादन केले. या वेळी संघटनेचे संघटक रवींद्र कोरडे, स्थानीक युनियन प्रतीनीधी संतोष घरत, जीवन भोईर, अंकुश भोईर, बळीराम भोईर, महेश पाटील, अशोक साळुंखे, अंकुश पाटील, पवन भोईर, लहु भोईर, अंकुश भोईर, कुणाल पाटील, प्रल्हाद भोईर, अमित पाटील, जिवन भोईर, वैभव भोईर, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सचिन शिंदे, दिलीप भोईर, अनिश कडू, रवींद्र भोईर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply