Breaking News

चौक, खालापूर पोलिसांची गस्त; धुंद चालकांवर कारवाई

 

चौक : प्रतिनिधी
रात्री अपरात्रीपर्यंत मौजमजेसाठी सरकारने वेळ द्यायचा आणि त्यांचे रक्षण पोलिसांनी ठेकेदार बनून करायचे हे कुठवर चालणार? असा प्रश्न पडतो. नव्या वर्षाच्या स्वागताला आपल्या परिवारासह लोक बाहेर पडतात आणि त्यांचे रक्षण पोलीस करताना दिसत आहेत. तसेच यावेळी कांही धुंंद वाहन चालकांवर कारवाईही केली.
काल दुपार पासूनच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरती चौक व खालापूरच्या पोलिसांची गस्त सुरू होती. चौक परिसर हा उच्च राजकीय पुढारी ते सेलिब्रिटी यांचा आहे. चौकवरून कर्जत रस्त्याला अनेक नेते ते अभिनेते यांचे फार्महाऊस बंगले असून पुढे कर्जत तालुक्यात अनेकांचे वास्तव्य आहे. याच मार्गावरून अनेक जण जग प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरान येथे जातात. तशी ही गाड्यांची वर्दळ सकाळ पासूनच सुरू होती.
चौक फाटा येथे सिग्नल वर वाहतूक पोलिस तैनात होते,तर याच चौकात पोलिसांनी तपासणी सुरू केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. युवराज सुर्यवंशी व पोलिस कर्मचारी प्रत्येक गाडीवर नजर ठेऊन होते. यावेळी स्थानिक यांच्यासह शहरातील दुचाकी,चार चाकी वाहन चालकांवर ड्रिंक अँड ड्राय,हेल्मेट न वापरणे, शिट बेल्ट न लावणे,वाहन परवाना नसणे,दुचाकी वर तीन जण प्रवास करणे अशा लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. रस्त्याला वर्दळ मोठया प्रमाणावर होती,पण कुठेही वाहतूक कोंडीमुळे रस्ता जॅम झाला नाही व कोणताच अनुचित प्रकार घडू दिला नाही. पोलिसांनी आपले कर्तव्य अतिशय नम्रपणे पार पाडले.

Check Also

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात; ३ ठार तर ८ जण जखमी

खोपोली : प्रतिनिधी पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढे कोंबडी वाहतूक करणारा …

Leave a Reply