Breaking News

जेएनपीटी-पळस्पे महामार्गावर दोन डंपरची धडक; चालकाचा मृत्यू

उरण : रामप्रहर वृत्त

जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या दोन डंपरच्या जोरदार धडकेत एका डंपर चालकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 348 वरील पागोटे (डीआरटी) परिसरातील मार्गावर मागून येणार्‍या मातीने भरलेल्या एका डंपरने दुसर्‍या डंपरला जोराने धडक दिल्याने डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती उरण वाहतूक पोलिसांनी दिली आहे.या मार्गावरून हजारो जड कंटेनर वाहने, तसेच मातीने भरलेल्या डंपरची वाहतूक होत आहे. या मार्गावरून वेगवान वाहतूक होत असल्याने अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. अपघात नक्की कशामुळे झाला, हे समजू शकले नाही. मात्र, धडक जोराची असल्याने वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply