Breaking News

उरण द्रोणागिरी नोडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत

उरण ः वार्ताहर

उरणचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून द्रोणागिरी नोड येथील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, कामगार नेते सुधीर घरत, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, जि. प.चे माजी सदस्य विजय भोईर, जसखारचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रशांत पाटील, विजय पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, नगरसेवक राजेश ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश बालदी व अन्य मान्यवरांनी स्वागत केले. या कार्यक्रमात विधित चंद्रहास पाटील यांची भाजप द्रोणागिरी नोड अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

Check Also

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …

Leave a Reply