Breaking News

‘उमेद’ आयोजित स्पर्धांचे महालक्ष्मी सरस प्रदर्शनात बक्षीस वितरण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
महिला उद्द्योजिकांच्या यशोगाथा, माहितीपट व लघुपट निर्मिती
स्पर्धेत सिंधुदूर्ग कणकवलीतील न्यू खुशबू स्वयंसहाय्यता समूहाने प्रथम पारितोषिक पटकावले या समुहाला राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक तीन लाख रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)च्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध
स्पर्धेत विशेष कामगिरी करणार्‍या समुहांचा महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2023 च्या उद्घाटन सोहळ्यावेळी सत्कार करण्यात आला.
उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांच्या कामाचे चित्रिकरण करण्यात आले. या स्पर्धेत नदूरबार, खोडांबळीचे जितेंद्र रमेश खवळे यांना व्दितीय पारितोषिक दोन लाख रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक तर सोलापूर, उत्तर सोलापूरचे सचिन अशोक जगताप यांना तृतिय पारितोषिक एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. रायगड म्हसळाचे अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्या., यवतमाळ राळेगावचे आनंद कसबे, कोल्हापूर वाळीवडेचे ऋतुराज रातपुते आणि कोल्हापूर करवीरचे गजानन भोसले यांना उत्तेजनार्थ 50 हजार रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. उमेद अभियानांतर्गत महाराष्ट्रात पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य व ज्ञानस्पर्धेत जनरल इडीपीसाठी औरंगाबादच्या आश्विनी क्षीरसागर यांना प्रथम पारितोषिक 11 हजार रुपये, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक तसेच रत्नागिरीच्या अदिती जाधव यांना व्दितीय पारितोषिक रु. 7 हजार सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. एग्रीकल्चर इडीपीसाठी प्रथम पारितोषिक बीडच्या मयुरी रवींद्र शिंदे, व्दितीय पारितोषिक माधुरी तगडे, प्रोडक्ट इडीपीसाठी प्रथम पारितोषिक मानसी पाटील तर द्वितीय पारितोषिक सिता डोंगर, प्रोसेस इडीपीसाठी प्रथम पारितोषिक कविता डोंगरे तर द्वितीय पारितोषिक मोनिका जाधव यांना देण्यात आले.
या वेळी सोजन्य अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान उमेद आणि पॅलिएटिव्ह इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणार आहे. हे अभियान ग्रामीण भागातील रुग्ण व्यक्ती, वयोवृध्दांसाठी उपयोगाचे ठरणार आहे.

विविध सामंजस्य करार
ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते उमेद अभियानाच्या आर्थिक सामवेशन विभागामार्फत ग्रामीण भागात बँकांच्या सेवा सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने तसेच बचत गटांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी उमेद आणि इंडिया पेस्ट पेमेंट बँक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच महिला बचत गटांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी उमेद आणि जागतिक महिला बँक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply