Breaking News

राज्यात उष्णतेची लाट

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील तापमानात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40अंशांच्या आसपास गेला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही एक कृती आराखडा तयार केला आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वर्षीच्या उन्हाळ्यापूर्वी जारी केलेल्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी कृती आराखड्यात काही निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये 50 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे कर्मचारी आणि मजूरांनी या उष्णतेच्या काळात काळजी घ्यावी. ज्या नागरिकांना बीपी आणि मधुमेहासारखे आजार आहेत (जे लोक बस ड्रायव्हर आणि पोलीस हवालदार) त्यांच्या कामाच्या योग्य वेळांमध्ये बदल केला जाईल. परीक्षांव्यतिरिक्त शाळा आणि कॉलेज हे सकाळच्या वेळेत भरवता येईल. मजुरांसाठी कामाच्या सुरक्षित वेळा ठेवाव्यात. यामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला प्राधान्य द्यावे. उष्णतेचा त्रास होणार्‍या लोकांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्ड राखून ठेवावेत, अशा सूचना राज्य सरकारने केल्या आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अलर्टमध्ये म्हटले की, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धारशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत घराबाहेर पडणे, शारीरिक कष्टाची कामे टाळावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply