Breaking News

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

खारघर ः प्रतिनिधी
खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकदिवसीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन विश्वज्योत हायस्कूल येथे शनिवारी (दि. 3) करण्यात आले होते. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आमदार पनवेल विधानसभा यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास विश्वज्योत हायस्कूल प्रिन्सिपल किशोरी अय्यंगार, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील, दिलीप जाधव, भरत कोंढाळकर, भाजप उत्तर रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी, युवा मोर्चा सरचिटणीस अ‍ॅड. अमर उपाध्याय, अकॅडमीचे बास्केटबॉल कोच विनय ढिल्लोड, परेश पाटील, प्रवीण जाधव यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत खारघर स्पोर्ट्स अकॅडमी विविध खेळांच्या स्पर्धांचे चांगल्या प्रकारे आयोजन करीत असल्याचे सांगितले. खारघरमधील खेळाडूंना सुयोग्य प्रशिक्षण मिळण्यासाठी प्रशिक्षकांची व्यवस्था असेल अथवा इतर सोयीसुविधा देण्याचे काम अकॅडमीच्या माध्यमातून अध्यक्ष किरण पाटील व माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील करीत असबद्दल त्यांनी कौतुक केले.
स्पर्धेत जवळपास 75 ते 80 संघांनी सहभाग नोंदवला. यात मुलींच्या टीमची संख्या जवळपास 25 ते 30च्या दरम्यान होती. बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन एवढ्या भव्य प्रमाणात नवी मुंबईत प्रथमच करण्यात आल्याचे बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.
खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील यांनी प्रास्ताविकात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे आमचे आधारस्तंभ असून त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यदायी व क्रीडाविषयक उपक्रम आयोजित करत साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल, उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील तसेच नवी मुंबईतील खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना खेळण्याच्या अद्यावत सुविधा मिळाव्यात या हेतूने रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी उलवे नोड येथे केलेली आहे याचाही आवर्जुन उल्लेख पाटील यांनी केला.
स्पर्धेच्या संध्याकाळच्या सत्रात आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर तुषार कोठांबे, असिस्टंट कमांडट व ओव्हरक्राफ्ट पायलट अपूर्वा होरे, वरिष्ठ निरीक्षक परिवहन आयुक्त कार्यालय धनराज शिंदे या मान्यवरांना खारघर स्पोर्ट्स अकॅडमीने प्रमुख मान्यवर म्हणून बोलावले होते. या मागील उद्देश म्हणजे या स्पर्धेतील सहभागी झालेले सर्व खेळाडू व इतरांनी या मान्यवर व्यक्तींकडून प्रेरणा घेत एक आदर्श निर्माण करावा.
बास्केटबॉल स्पर्धेस भाजप महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, अश्विनी भुवड, सोशल मीडिया पनवेल तालुका संयोजिका मोना अडवाणी, खारघर शहर ससंयोजिका शोभा मिश्रा, मंजू चोप्रा, निर्मला यादव, सुरेखा जाधव, मैत्रिणी कोळी व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
बास्केटबॉल स्पर्धेसाठी प्रायोजकत्व देणारे पेस आयआयटी अ‍ॅण्ड मेडिकल खारघरचे सेंटर हेड डॉ. मुकेश सिन्हा, टुडे ग्लोबल डेव्हलपर्सचे भद्रेश शहा, मंगेश आढाव, सत्यम ग्रुपचे विनोद पटेल यांचे मोलाचे योगदान लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीचे बास्केटबॉल कोच विनय ढिल्लोड, परेश पाटील, अक्षय राणा, अमित थिटे, प्रवीण जाधव तसेच आदित्य हातगे, दिनेश यादव, गोपाल राजपूत, कुणाल देवकर, रणजीत पाटील, विराज प्रधान यांनी विशेष मेहनत घेतली. बेलापूर अपोलो हॉस्पिटलच्या वतीने प्रथमोपचारासाठी स्टाफ नर्स तसेच अ‍ॅम्बुलन्स सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती.
स्पर्धेचे सूत्रसंचालन नवीन खरे यांनी केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply