Breaking News

सीकेटी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

स्व. चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स  अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी (दि. 13) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगु काना ठाकूर  यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते   रामशेठ ठाकूर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर उपस्थित होते.
या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेल मनपा माजी उपमहापौर सिताताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, भाजपच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर आदींची विशेष उपस्थिती लाभली.
प्रमुख अतिथी डॉ. राजन वेळूकर म्हणाले की, माणसाने आयुष्यात नेहमी सक्रिय विद्यार्थी बनून सातत्याने अभ्यास करीत ज्ञानसंपादन केले पाहिजे, तसेच आई-वडिलांचे ऋण लक्षात ठेवले पाहिजे. दूरदृष्टी आणि परिश्रमाच्या माध्यमातून सभोवतालच्या परिस्थितीमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला पाहिजे व चांगली पुस्तके वाचायला शिकले पाहिजे. आयुष्यात प्रगती सोबत विकास करणे महत्त्वाचे आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची प्रवृत्ती जागृत करणे गरजेचे आहे.
या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे चांगु काना ठाकूर कॉलेजचे प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. पाटील यांनी कौतुक केले. स्व. चांगु काना ठाकूर यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजिलेल्या या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील यांनी महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडंट कौन्सिल व स्टुडंट वेलफेअर विभागाच्या चेअरमन डॉ. एम. ए. म्हात्रे, आयक्यूएसी विभागाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव व महिला विकास कक्षाच्या चेअरमन डॉ. आर.डी.म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. डॉ. आर. व्ही. येवले , प्रा. डॉ. जि. एस. तन्वर, प्रा. ए. व्ही. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभारप्रदर्शन  प्रा.डॉ.एस.एन.वाजेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मान्यवरांनी कौतुक केले.

फक्त पुस्तकी ज्ञान घेऊ नये -लोकनेते रामशेठ ठाकूर
खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातपारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, फक्त पुस्तकी ज्ञान न घेता खर्‍या अर्थाने व्यक्तिमत्व घडवणे हे आयुष्याचे ध्येय असले पाहिजे. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply