Breaking News

नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांच्या प्रयत्नाने नवीन पनवेल येथील सेक्टर 15 पोदी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र मंगळवारी (दि. 21) सुरू करण्यात आले. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते झाले असून या केंद्रावर कोविशिल्ड या लसीचे नागरिकांना डोस देण्यात येणार आहेत.

उद्घाटनाच्या वेळी प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशीला घरत, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, भाजप पनवेल शहर महिला अध्यक्ष वर्षा नाईक, कमलाकर घरत, जयराम मुंबईकर, वैद्यकीय सेल अध्यक्ष ज्योती देशमाने, सुहासिनी केकाणे, शिवानी रावते, लक्ष्मी चव्हाण, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा डामरे, डॉ. महाजन व त्यांची टीम, लांगी, समीर मोरे, संतोष साळवे, दिनेश सुर्वे आदी उपस्थित होते.

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply