Breaking News

न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची एमएमआरडीएकडे मागणी

मुंबई : रामप्रहर वृत्त
न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधित मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात मुंबई येथे एमएमआरडीएच्या कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 24) बैठक झाली. या वेळी त्यांनी लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे न्हावा आणि गव्हाणमधील अनेक मच्छीमार प्रकल्पबाधित झाले आहेत. या प्रकल्पग्रस्तांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न प्रलंबित असून या संदर्भात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रतीमा कुदळवाडकर यांच्यासोबत मुंबई येथील कार्यालयात सकारात्मक चर्चा झाली. या वेळी लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
या बैठकीला उद्योजक जे.एम.म्हात्रे, न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, सदस्य सागरशेठ ठाकूर, किशोर पाटील, सुहास भगत, वंदना पाटील, एमएमआरडीएचे अधिकारी एम.पी.सिंग यांच्यासह न्हावा आणि गव्हाणमधील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply