Breaking News

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे यांचा पनवेल-उरण विधानसभा महायुतीच्या वतीने रविवारी (दि. 16) सकाळी 10 वाजता पनवेलमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पनवेल-उरण विधानसभा महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply