Breaking News

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर, उरणमधून आमदार महेश बालदी यांना उमेदवारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. 20) जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत.
या यादीत पहिले नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असून त्यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून आमदार महेश बालदी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपने पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना तिकिट दिल्याचे पहावयास मिळते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply