Breaking News

पनवेलमध्ये शनिवारी युवा निर्धार मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल विधानसभेच्या वतीने शनिवारी (दि. 26) सायंकाळी 6 वाजता कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आपला देश युवकांचा म्हणून जगात ओळखला जातो. त्याच अनुषंगाने युवकांच्या हक्कांसाठी तसेच त्यांच्या सर्व स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने काम करत असतो. या युवा मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे युवा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला युवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply