Breaking News

पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे बजवा -आमदार प्रशांत ठाकूर

नवनियुक्त भाजप मंडळ अध्यक्षांचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या तसेच पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे बजवावी, असे आवाहन केले.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील नेरे मंडळ अध्यक्षपदी भूपेंद्र पाटील, तळोजा मंडळ अध्यक्षपदी दिनेश खानावकर, नवीन पनवेल मंडळ अध्यक्षपदी दशरथ म्हात्रे, खारघर मंडळ अध्यक्षपदी प्रवीण पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्षपदी सुमित झुंझारराव, कळंबोली मंडळ अध्यक्षपदी अमर पाटील, कामोठे मंडळ अध्यक्षपदी विकास घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह उरण विधानसभा मतदारसंघातील उलवे मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती झालेले रूपेश धुमाळ व कर्नाळा मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांची सोमवारी (दि. 21) पनवेल येथे भेट घेतली.
या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष सध्या संपूर्ण देशभरात संघटनात्मक बळकटीसाठी मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या करीत आहे. ही प्रक्रिया विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहे. भाजपने मंडळ आणि जिल्हा अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी वयमर्यादा निश्चित केली आहे. मंडळ अध्यक्षांसाठी वयोमर्यादा 35 ते 45 वर्षे, तर जिल्हाध्यक्षांसाठी 45 ते 60 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ही पावले पक्षात तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी उचलण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने तालुका मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्ष संघटनेला बळ देण्याचे काम केले आहे. काल राज्यात एकाच वेळेला आठशेपेक्षा जास्त मंडळ अध्यक्षाची नियुक्ती झाली आहे. ही सर्व तरुण टीम जोडली गेली आहे. आपला पक्ष अधिकाधिक ताकदवान होत चालला आहे. नवनियुक्त तालुका मंडळ अध्यक्षांवर त्या-त्या मंडळाची जबाबदारी आहे आणि पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून ते जबाबदारीने काम करतील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त करीत संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध काम करा, अशी सूचनाही केली.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, नरेश गायकवाड, प्रभाकर बहिरा, कळंबोली माजी अध्यक्ष रविनाथ पाटील, विजय पाटील, कृष्णा पाटील, सतिश पाटील, प्रकाश खैरे, रूपेश नागवेकर, केदार भगत, किशोर चौतमोल, रोनक शेट्ये, प्रशांत शेट्ये, भीमराव पोवार, प्रवीण मोरबाळे, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply