पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील भोकरपाडा आणि भानघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन निधीमधून अंगणवाडी बांधण्यात आली आहे. या अंगणवाड्यांचे उद्घाटन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 17) झाले. या वेळी बोलताना त्यांनी, कार्यकर्त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आपल्या गावची विकासकामे मार्गी लावावीत, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पनवेल तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, रमेश पाटील, माजी सरपंच शांताराम पोपेटा, अलका तांडेल, नितीन पोपेटा, माजी उपसरपंच रोशन पोपेटा, गाव कमिटी अध्यक्ष नारायण माळी, उपाध्यक्ष मदन मढवी, सदस्य रघुनाथ मोहिते, सुनील मढवी, भरत तांडेल, सागर मढवी, गोटीराम चाहू फुलोरे, अशोक बबन फुलोरे, भास्कर फुलोरे, गणेश फुलोरे, हनुमान फुलोरे, लहू फुलोरे, हरिदास फुलोरे, रमेश फुलोरे, गजानन फुलोरे, सखाराम फुलोरे, रूपेश फुलोरे, कल्पेश फुलोरे, बळीराम फुलोरे, काशिनाथ फुलोरे, साजन फुलोरे, निखिल ठाकूर, आनंद फुलोरे, अनिकेत फुलोरे, हरिभाऊ म्हात्रे, दशरथ फुलोरे, दीपक फुलोरे, संजय फुलोरे, सुनील फुलोरे, संकेत फुलोरे, निकेतन फुलोरे, अभिजीत फुलोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या वेळी युवा नेते रोशन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper