Breaking News

पनवेल ते पंढरपूर सायकल वारी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत तसेच शरीरस्वास्थ्यासह आध्यात्मिक वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल रायडर्स यांच्या वतीने पनवेल ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या वारीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
सायकल वारीचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भगवा झेंडा फडकावून झाला. या वेळी त्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभागी सर्व सायकलस्वारांचे अभिनंदन केले तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सुरक्षितपणे प्रवास करा, अशा शुभेच्छा दिल्या.
20 ते 22 जून अशी तीन दिवसांत ही वारी पूर्ण होणार असून या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचणार आहे. वारीच्या शुभारंभावेळी माजी नगरसेवक गणेश कडू यांच्यासह पनवेल रायडर्सचे सदस्य उपस्थित होते.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply