आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष तळोजा मंडळच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन रविवारी (दि. 10) करण्यात आले होते. देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह असंख्य नागरिक या तिरंगा पदयात्रेत सहभागी झाले होते.
माजी सैनिक राजेश कदम यांच्या हस्ते भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन करून पदयात्रेला सुरुवात झाली.
भाजपच्या तळोजा फेज 1 कार्यालयापासून सुरू झालेल्या तिरंगा पदयात्रेत आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, सरचिटणीस विनोद घरत, अंकुश पाटील, उपाध्यक्ष निर्दोष केणी,सुरेश पाटील, समीर गोंधळी, चिटणीस प्रिया हनुमंते, नितीन भोईर, शिल्पा गायकवाड, सचिन वास्कर, विनेश कदम, शशिकांत गोंधळी, माजी नगरसेवक पापा पटेल, किरण दाभणे, रविकांत म्हात्रे, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मन्सूर पटेल, महिला मोर्चा अध्यक्ष आशा बोरसे, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष कडू, विशाल घरत, निलेश दाढावकर, रूशाल पाटील, संकेत वगरे, प्रभाग अध्यक्ष दीपक पाटील, कृष्णा पाटील, जगदीश घरत, पं.स. अध्यक्ष प्रकाश खैरे, माजी सैनिक रमेश कदम यांच्यासह नागरिक, युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper