Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत सातारा येथे शैक्षणिक दौरा

सातारा : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्था आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे एक महत्त्वाचा व ज्ञानवृद्धी करणारा अभ्यास दौरा शुक्रवारी (दि. 7) यशस्वीरित्या पार पडला. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने आणि उपस्थितीत हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याने प्रतिपादन केले.
सद्यस्थितीत अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार वाढवणे ही काळाची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या इतर विद्यालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान कशा प्रकारे चालते याचा अभ्यास करण्यासाठी तसेच ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याच्या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य व शिक्षकांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा अभ्यास दौरा झाला.
या दौर्‍यात खंडाळा (जि. सातारा) येथील सुशीला शंकर गाडवे महाविद्यालय आणि सातारा शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या दोन प्रमुख महाविद्यालयांना भेट देण्यात आली तसेच खंडाळ्याच्या महाविद्यालयात ‘गुरुजी’ अटल टिंकरिंग लॅबचे निरीक्षण करण्यात आले. प्रा. डॉक्टर भावना आंबूडकर यांनी लॅबची माहिती दिली. येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारे आगळेवेगळे प्रकल्प दाखवण्यात आले, तर सातारा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात रिसर्च सेंटर, रोबोटची निर्मिती, थ्री डी प्रिंटर, थ्री डी स्कॅनर, सीएनजी मशीन्स व प्रोग्रामबल ड्रोनर यांसारख्या अद्यावत मशीन्सचे कार्य दाखवले गेले.
या वेळी एक्झिक्यूटिव्ह राहुल घरत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य ए.सी. आत्तार, डॉ.वाय.के. कानसे, डॉ. आनंद तापसे, प्रा.ए.ए. महादार, प्रा.गणेश दांगट, डॉ.वानते, प्रा.सुप्रिया, आर.ए. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, आपल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान मिळाले पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत या सर्व सुविधा पोहचवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याने अशा टिंकरिंग लॅब आपल्या विद्यालयातही असायला हव्यात.
या अभ्यास दौर्‍यात प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, प्राचार्य निशा नायर, प्राचार्य अनुराधा काठे, प्राचार्य सायली वालावलकर, प्राचार्य किरण सुथार सहभागी झाले होते. हा अभ्यास दौरा सर्वच विद्यालयांसाठी एक मार्गदर्शनपर ज्ञानाचा खजिना ठरला असून भविष्यात या अभ्यास दौर्‍याचे अतिशय अनुकूल परिणाम पहायला मिळतील, असे सर्वच प्राचार्य व शिक्षकांनी सांगितले.

Check Also

चित्रपटाच्या नवीन भागांचा ट्रेंड

बस्स एक पिक्चर सुपर डुपर हिट होऊ देत… त्याच्या वाढत्या उत्पन्नाच्या भराभर ब्रेकिंग न्यूज येऊ …

Leave a Reply