पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच धर्तीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळंबोली उपशहरप्रमुख संजय भालेराव यांच्यासह लोटस सोसायटीमधील रहिवाशांनी शुक्रवारी (दि. 19) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. ़
भाजपच्या पनवेल तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक बबन मुकादम, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, विद्या फरांदे, अंकिता मुकादम, मेघा मुकादम, रत्नमाला शिंदे, मनिषा तिवारी, अतुल वाघमारे, मयूर वालके, गणेश रणदिवे, अभिषेक दळवी, दिलीप खारके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लोटस हे केवळ एका सोसायटीचे नाव नसून प्रगतीचे चिन्ह आहे. ज्याप्रमाणे भाजपने विकासाचे काम केले आहे, त्याचप्रमाणे लोटस सोसायटीच्या आणि पर्यायाने कळंबोलीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सदैव तत्पर राहील. प्रगतीच्या दिशेने जे काही आवश्यक आहे, ते सर्व सहकार्य पक्षाच्या वतीने दिले जाईल, अशी ग्वाही आपल्या मार्गदर्शपर संबोधनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली तसेच माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्या कार्याचे कौतुक केले.
या वेळी शिवसेना उबाठा पक्षाचे कळंबोली उपशहर प्रमुख संजय भालेराव, प्रकाश किरवे, भूषण मोरे, बजरंग सावंत, पंकज कदम, अजय नेवसे, वसंत पाटील, सोनाली मोरे, संध्या पाटील, सुचिता नेमाणे, सुनिता चौहान, संगीता पाग, स्नेहल नामदास, दर्शना एडगे, कल्पना एडगे, सोनी पटकोरे, प्रतिभा पाटील, सुगंधा पाटील, पल्लवी खानोलकर, राजश्री नाईक, सुमती राऊत, वैशाली गायकवाड, मनिषा सावंत यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …
RamPrahar – The Panvel Daily Paper