Breaking News

पनवेल तालुक्यातील भाताण येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील भाताण ग्रामपंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी (दि.४) मोठ्या उत्साहात पार पडला. या अंतर्गत गावात रस्ते काँक्रीटीकरण, समाजमंदिर आणि जलकुंभाची उभारणी अशा एकूण ६३ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर आणि माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
भाताण गावातील गणेश भोईर यांच्या घरापासून ते अशोक सम्राटनगरपर्यंतच्या रस्त्याचे १८ लाख रुपये खर्चून काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे तसेच अशोक सम्राटनगरमध्ये १५ लाख रुपये खर्चाचे समाजमंदिर आणि संपूर्ण गावाची पाण्याची गरज भागवण्यासाठी ३० लाख रुपये खर्चून एक लाख लिटर क्षमतेचा भव्य जलकुंभ उभारला जाणार आहे.
या कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, सदस्य अस्मिता पाटील, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम, जिल्हा परिषद सदस्य अनन्या गाताडे, विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष मंगेश लबडे, सरपंच तानाजी पाटील, तानाजी खंडागळे, प्रवीण खंडागळे, महेंद्र गोजे, राम गोजे, महादेव पाटील, प्रवीण ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांच्या माध्यमातून भाताण गावातील पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटणार असून ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर समाजसेवेतील हिरा -आमदार रविशेठ पाटील

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट …

Leave a Reply