Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर वाढदिवस सप्ताहानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

उरण : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस सप्ताह जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत. यानिमित्त उरण कोप्रोली येथील आदिवासी वाडीवरील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोप्रोली शाळेत प्रशांत पाटील यांचे वडील डॅडींच्या हातून मुलांना शालेय बॅग, वह्या आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रशांत पाटील यांनी मनोगतात सांगितले की, आपल्या उरण तालुक्यातील आदिवासींच्या मुलांना असे शैक्षणिक साहित्यातून त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांनी कोप्रोली भाजप कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक केले. तुम्ही करीत असलेली समाजाची सेवा ही मोठी बाब आहे. शशीकांत पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक करीत असताना त्यांनी कोप्रोलीच्या पाण्यासाठी केलेली धडपड आणि केलेली मेहनत याचे कौतुकही केले. 

या वेळी भाजप ज्येष्ठ नेते पी. जे. पाटील (डॅडी), वाहतूक जिल्हा चिटणीस प्रशांत पाटील, महिला तालुका अध्यक्षा संगीता पाटील, बुथ अध्यक्षा कामिनी पाटील, ग्रामपंचायत सदस्या बेबी कातकरी, कोप्रोली महिला अध्यक्षा नीशा म्हात्रे, भाजप तालुका उपाध्यक्ष शशिकांत (शशी) पाटील, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, विभाग अध्यक्ष वाहतूक दत्तराज म्हात्रे, युवक अध्यक्ष प्रितम म्हात्रे, भाजप कार्यकर्ता विकी म्हात्रे, लाखन पाटील, शाळा व्यवस्थापन कमिटी, शिक्षिका शोभा म्हात्रे आणि प्रणय ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply