नांदेड : अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते. ती वाटणारच, कारण त्यांचे बुरे दिन सुरू झाले. या सरकारने योजनांतील दलालीही बंद केली आहे. त्यामुळे आता कुणीही तुम्हाला विचारत नाही. हे तुमच्याच पापाचे भोग असून, पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्नेही पाहू नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. नांदेडमधीतील भक्ती लॉन्स येथे आयोजित भाजपच्या बुथ कमिटी मेळाव्यात ते बोलत होते. पुलवामा येथील हल्ल्यानंतर 48 तासांच्या आत यातील आंतकवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. सेनेला खुली सुट दिल्यानंतर काय होते, हे सर्जिकल स्ट्राईकमधून जगाने पाहिले. आता पुन्हा एकदा सेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोकळीक दिली असून, हा नवा भारत आहे, असा संदेश जगात गेला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper