Breaking News

विंडीज दौर्यासाठी युवा खेळाडूंना संधी ; भारतीय संघ जाहीर; धोनीच्या जागी पंतची निवड

मुंबई : प्रतिनिधी

पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारताच्या टी-20, एकदिवसीय व कसोटी क्रिकेट संघाची घोषणा रविवारी (दि. 21) करण्यात आली. विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा दौरा होणार असून, टी-20 व एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीची जागा ऋषभ पंत घेणार आहे. कसोटीसाठी पंतसोबत रिद्धिमान साहा याला अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून घेण्यात आले आहे.

एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पाच सदस्यीय निवड समितीच्या बैठकीनंतर नव्या संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार विराट कोहली हाही या बैठकीला उपस्थित होता. माजी कर्णधार एमएस धोनी याने दौर्‍यातून माघार घेतल्याचे आधीच जाहीर केल्याने त्याचा संघ निवडीसाठी विचार झाला नसल्याचे समजते.

  • कोणाला विश्रांती? कोणाला संधी?

महेंद्रसिंह धोनीसह गोलंदाज जसप्रीत बुमराह व अष्टपैलू हार्दिक पांड्या यांना वन-डे व टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. बुमराहला केवळ कसोटी संघात स्थान आहे, तर शिखर धवन कसोटीत नसेल. त्याच्याऐवजी चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारीला संधी मिळाली आहे. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी कसोटीत पुनरागमन केले आहे.

– कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

– वन डे संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

– टी-20 संघविराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुनाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply