Breaking News

‘सावधान’ चित्रपट उद्या होणार प्रदर्शित

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

एनसीजी एंटरटेंमेंटची निर्मिती असलेला ‘सावधान-एक अद्भुत कहानी’ हा हॉरर हिंदी चित्रपट शुक्रवारी (दि. 26) प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने नवीन पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नीळकंठ चिमाजी गायकवाड व संगीता गायकवाड हे या चित्रपटाचे निर्माते; तर संदीप मिश्रा प्रमुख दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट हॉररपट आहे. यातील गाणीही छान आहेत. आघाडीच्या गायिका साधना सरगम, अविनत दास, राकेश, लक्ष्मीकांत यांनी गीते गायली आहेत. यामध्ये हेमंत बिर्जे, रितू पांडे, रमेश गोयल प्रमुख भूमिकेत असून, प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा, असे आवाहन निर्माते नीळकंठ गायकवाड व संगीता गायकवाड यांनी केले आहे.

शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दुपारी अडीच वाजता ओरियन मॉलमध्ये यानिमित्ताने होणार्‍या पहिल्या शोसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, सुभाष भोपी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply