Breaking News

पनवेलमध्ये राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा

पनवेल : बातमीदार

पनवेलमध्ये 4 ऑगस्टला विशेष बालवयोगटासाठी मिनी जलद चषक राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा व खुल्या गटासाठी मिनी ब्लिट्झ (अती जलद) चषक अशा दोन स्पर्धांचे आयोजन विरुपाक्ष मंगल कार्यालय सभागृहात करण्यात आले आहे.

अस्मिता चेस अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मागील चार राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये एक हजार 500हून अधिक स्पर्धकांचा व शेकडो पालकांचा सहभाग लाभला होता. अशा स्पर्धांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा म्हणून पाचव्या स्पर्धेत  8, 10, 13, 15, 25 वयोगटाखालील, दिव्यांग व फिडे मानांकित खेळाडू भाग घेऊ शकतात. स्वीस लीग पद्धतीने ही स्पर्धा सहा ते आठ फेर्‍यांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. ओरीयन मॉलचे मनन परुळेकर यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

Check Also

राम तेरी गंगा मैली @४१ वर्षे; राज कपूरच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट

चित्रपटाच्या नावात त्याचं व्यक्तिमत्त्व अथवा ओळख व्हायला हवी. त्यातही दिग्दर्शक दिसतो. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे …

Leave a Reply