Breaking News

रिक्षा थांब्याचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेचा थांबा सुरू झाला आहे. या थांब्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सोमवारी (दि. 5) करण्यात आले. या रिक्षा थांब्यामुळे पनवेल फाटा ते टेंभोडे-नेवाळी या मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

या रिक्षा थांब्याच्या उद्घाटनाच्या वेळी वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, सरचिटणीस मोतीलाल कोळी, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, रवी नाईक, शिवाजी दुर्गे, समिरा चव्हाण, नगरसेवक संतोष शेट्टी, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, रूपेश ठोंबरे, युवानेते किशोर चौतमोल, हर्षवर्धन पाटील, रूपेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply