Breaking News

ग्राहकांना लुटणार्या बँकांना आरबीआयचा झटका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

आरबीआयने बँकांना फटकारले असून एटीएम ट्रांझेक्शन लिमिटच्या नावाखाली ग्राहकांना लुटण्याच्या प्रकारावर चाप लावला आहे. बँकांकडून महिन्याला केवळ पाच ट्रान्झेक्शन मोफत दिली जात होती. यानंतर प्रत्येक ट्रान्झेक्शनला 20 ते 25 रुपयांचे शुल्क आकारले जात होते. बर्‍याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल होतात. ही ट्रान्झेक्शनही बँका पहिल्या पाच ट्रान्झेक्शनमध्ये धरत होत्या. यामुळे पुढील एटीएम ट्रान्झेक्शनवर बँका शुल्क आकारत होत्या. यामुळे ग्राहकांची लूट होत होती.

अनेकदा आपण अकाऊंटमधील बॅलन्स, पासवर्ड बदलण्यासाठी एटीएममध्ये जातो. ही ट्रान्झेक्शनही या पाच मोफत ट्रान्झेक्शनमध्ये बँका पकडत होत्या. यामुळे जर पाचनंतरच्या ट्रान्झेक्शनमध्ये तुम्ही अकाऊंट बॅलन्स तपासायला गेला तरीही शुल्क कापले जात होते. यामुळे रिझर्व्ह बँकेकडे वाढलेल्या तक्रारींमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.

तांत्रिक गोष्टी किंवा एटीएममध्ये पैसे नसल्याने ट्रान्झेक्शन फेल झाल्यास मोफत ट्रान्झेक्शनमध्ये मोजू नये, तसेच नॉन कॅश ट्रान्झेक्शनही या श्रेणीमध्ये पकडू नये, अशा सूचना आरबीआयने बँकांना दिल्या आहेत. खात्यातील रकमेची माहिती, चेकबुकसाठी अर्ज, टॅक्स भरणा, पैसे ट्रान्सफर या सुविधा पाच ट्रान्झेक्शनच्या लिमिटमध्ये येत नाहीत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply