Breaking News

‘होमगार्डमध्ये सामील व्हा’

म्हसळा ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, रोहा, खालापूर (चौक), मुरूड, महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, पाली या तालुक्यातून होमगार्ड पथकांत भरती प्रक्रिया दि. 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत सुरू आहे. तरी आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवारांनी भाग घ्यावा, असे आवाहन म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी पोलीस पाटील तटरक्षक दल सभेत केले.

ऑनलाईन फॉर्म भरून, त्याची प्रिंट काढून, सदरची प्रिंट मूळ कागदपत्रांसह व त्यांच्या छायांकित प्रतिसह रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय अलिबाग येथे कवायत मैदानावर खालील तारखेस उपस्थित राहावे. दि. 16 सप्टेंबर अलिबाग, पेण, रोहा, खालापूर (चौक), मुरूड तालुक्यातील उमेदवार व दि. 17 सप्टेंबर महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, पाली तालुक्यातील उमेदवारांनी या तारखांना सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले.

शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण, वयोमर्यादा 20 ते 50 वर्ष (दि. 1 सप्टेंबर 2019 पर्यंत) उंची पुरुषांकरिता 162 सेमी व महिलांकरिता 150 सेमी, छाती पुरुषांकरिता 76 सेमी व फुगवून 81 सेमी (छाती 5 सेमी फुगवता येणे आवश्यक आहे), खेळाडू, आयटीआय, जडवाहन परवानाधारक, एनसीसी, बी व सी प्रमाणपत्र धारक, माजी सैनिक, नागरी संरक्षण सेवेत असलेले, परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्रधारक यांना तांत्रिक अर्हता गुण दिले जातील.

Check Also

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …

Leave a Reply