Breaking News

माथेरानच्या पॉईंट्सवर माहिती फलक

कर्जत : बातमीदार

माथेरानच्या पॉईंट्सवर महितीफलक नसल्यामुळे पर्यटकांना त्या पॉईंटचे महत्व समजत नव्हते, यावर मात करण्यासाठी माथेरान वनविभाग सरसावले आहे. माथेरानच्या सर्व पॉईंट्सवर पॉईंटचे नाव, त्याचे वैशिष्ट्य, जंगलात आढळणारे प्राणी अशा स्वरूपातील माहिती या फलकावर दिल्यामुळे पर्यटकांना पॉईंटची मजा घेता येणार आहे. माथेरान हे पर्यटनस्थळ असून येथे पर्यटकांना हवेहवेसे वाटणारे पॉईंट्स आहेत. निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक या पॉईंटवर जातात. मात्र तिथे माहिती किंवा सूचना फलक नसल्याने नक्की काय पहायचे, या संभ्रमात पर्यटक पडत होते. माथेरानमध्ये पाहण्यासारखे काय आहे, याची माहिती  मिळत नसल्यामुळे पर्यटक निराश होत होते. यावर वनविभाग व माथेरान वन व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तोडगा काढण्यात आला आहे. त्यांनी येथील सर्व पॉईंटवर माहिती फलक लावून पर्यटनाला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. हे माहिती फलक पर्यावरणपूरक बनविले असून कुठेही प्लास्टिकचा वापर केलेला नाही. यावर शब्द रंगाने रंगवून ते सर्व पॉईंट्सवर लावले आहेत. त्यामुळे पर्यटकांना या फलकामुळे पॉईंटविषयी योग्य माहिती मिळणार आहे, असे माथेरान वन व्यवस्थापन समितीकडून पत्रकारांना सांगण्यात आले.

वन व्यवस्थापन समिती माथेरानमध्ये आलेल्या वाहनांची कर स्वरूपात ठराविक रक्कम घेते. त्या करातून आलेल्या रकमेतून माथेरानमधील पॉईंटचे सुशोभीकरण चालू असून प्रत्येक पॉईंटवर महितीफलक लावण्यास सुरुवात झाली आहे.

-नारायण राठोड, वनक्षेत्रपाल, वन विभाग माथेरान

माथेरानमधील पॉईंटवर माहिती फलक नसल्यामुळे पर्यटक अक्षरशः गोंधळून जायचे. अनेक पर्यटकांनी ही व्यथा मांडली.  निधी उपलब्ध झाला, तेव्हा वन व्यवस्थापन समितीने माहिती फलक लावण्याचे ठरविले व त्यानुसार आता हे तयार झालेले माहिती फलक आम्ही संबंधीत ठिकाणी बसवत आहोत.

-योगेश जाधव, अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती, माथेरान

Check Also

फिल्मी गॉसिप्सची चव गेली, अळणी वाटू लागलंय….

शर्मिला टागोरने शैलीदार फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मन्सूर अली खान पतौडीची विकेट कशी काढली आणि …

Leave a Reply