उरण : वार्ताहर
विधानसभा निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी उरण, उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे देखरेखीखाली स्थिर संरक्षण पथक व फिरते संरक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येऊन पुढे मतदान होईपर्यंत राहणार आहे.
प्रत्येक पथकात तीन पोलीस कर्मचारी, तीन इतर कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांची नेमणूक करण्यात आली आहे. उरण परिसरात शेवा चारफाटा (बोकडवीरा पोलीस चौकी), मोरा, खारपाडा, गव्हाण, शेडुंग या चार ठिकाणी ही पथके ठेवण्यात आली आहेत. सदर पथक 24 तास कार्यरत असतील. कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास अटेंड करणे, दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, त्यांच्या डिकी तपासणे, काही बेहिशेबी रक्कम आढळल्यास पथकाने गुंन्हा दाखल करणे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper