Monday , June 5 2023
Breaking News

श्रमयोगी मानधन योजनेमुळे असंघटित कामगारांना आधार

सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत.त्याच धर्तीवर आता देशातील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली असून, ती सर्व असंघटित कामगारांना मोठा आधार ठरणार असल्याचे प्रतिपादन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) पनवेल येथे केले.

‘मेहनत ज्यांची देशाचा आधार, पेन्शनचे स्वप्न त्यांचे साकार’ या ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने’चा शुभारंभ मंगळवारी झाला. या योजेनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले असून, त्या अंतर्गत पनवेल मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या योजेनेविषयी मार्गदर्शन केले.

या वेळी केंद्रीय उपमुख्य कामगार आयुक्त करमचंद, सहाय्यक कामगार आयुक्त राजशेखरन नायर, श्री. सनी, कल्पना सिसोदीया, श्रमप्रवर्तन अधिकारी कमलेश शेलार, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, नगरसेविका दर्शन भोईर, मुग्धा लोंढे, कामगार नेते जितेंद्र घरत, सुरेश पाटील, रवी नाईक, मोतीराम कोळी, पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील, शेखर तांडेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार व असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वयोगटानुसार 55 ते 200 मासिक अंशदान जमा करून वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन कामगारांना प्राप्त होणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य हे की अंशादानामध्ये लाभार्थी आणि केंद्र शासनाचा समान हिस्सा असणार आहे. योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply